ज्येष्ठ नागरिक संघातर्फे झेंडावंदनाचा कार्यक्रम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जेष्ठ नागरिक संघ आणि समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले उद्यानातील ज्येष्ठ नागरिक भवनाच्या परिसरात सर्व जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत झेंडावंदनाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या पंचाहत्तराव्या वर्षानिमित्त होणार आहे. स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांना हे झेंडावंदन खुले आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सातारा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीमती वैदेही देव व कार्यवाह विजय मांडके तसेच समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ पिसाळ व कार्यवाह विजय देशपांडे यांनी केले आहे.
झेंडावंदनाच्या निमित्ताने चंदू मिठाईवालाचे चंद्रहास जाधव हे सर्वांचे मिठाई देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. झेंडावंदनाच्या या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठांनी उपस्थित राहावे असे आवाहन सातारा ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार मदन देवी व सहकार्यवाह अशोक कानेटकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!