परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा 


स्थैर्य, पाचगणी, दि.०५: पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, इथोपिया देशाचे परदेशी नागरिक अब्देला  महंमदगाल व ओमर महंमद गाल हे  त्यांच्या व्हीसाची  मुदत  संपलेली  असताना  व्हीसा  मुदतवाढ करून  घेणे  आवश्यक  असतानाही  त्यांनी वैध व्हीसा नसताना पाचगणी (ता.  महाबळेश्‍वर) येथील डिसोझा  एज्युकेशन  ट्रस्ट  ठिकाणी  15 ऑगस्ट  2020 ते 15 जानेवारी 2021 असे 5 महिने वास्तव्य  केले. म्हणून  वरिल  नमूद  परदेशी  नागरिक यांनी परदेशी  नागरिक कायदा  1946 ते कलम 14 (अ) (ब) चे  उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद पो. कॉ. वैभव शामराव भिलारे यांनी दिली आहे.या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  स.पो.फौ कदम व त्यांचे सहकारी करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!