स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 26, 2021
in देश विदेश

स्थैर्य, मुंबई, दि.२६: राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा अवैध मासेमारांविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे. हा कायदा येईपर्यंत अशा घटनांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली. पर्ससीन नेटविरुद्ध पारंपरिक मच्छिमारांचे सुरू असलेले उपोषण संपविण्याचे आवाहनही श्री. शेख यांनी यावेळी केले.

दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने श्री. शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी श्री. शेख बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह शिष्टमंडळातील बाळकृष्ण पावसे, प्रकाश रघुवीर, गोपीचंद चौगले, विष्णू ताबीब, सोमनाथ पावसे, गणेश घोगले, हरेश्वर कुलाबकर, यशवंत खोपटकर आदी उपस्थित होते. श्री. शेख म्हणाले की, राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य शासन कडक कायदा करत आहे. येत्या काही काळातच हा कायदा लागू होईल. या कायद्यामध्ये अवैध पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणे तसेच हायस्पिड बोटींचा वापर करून मासेमारी करणे आदींविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. यामुळे अशा अवैध मासेमारींना आळा बसेल. तोपर्यंत सध्या अशा बोटींविरुद्ध कडक कारवाई करावी. या कारवाईसाठी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पीड बोट देण्यात येईल. तसेच अवैध मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी कोस्ट गार्डसह पोलीस व महसूल यंत्रणाबरोबर बैठक घेण्यात येईल.

मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. पाटणे म्हणाले, अवैध मासेमारीविरुद्ध कारवाई सुरू आहे. तसेच इतर राज्यातून आलेल्या बोटींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांशी चर्चा झाली असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच यासाठी अंमलबजावणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
कोकण किनारपट्टीवर तीन लँडिंग पॉईंट उभारणार – अस्लम शेख

आमदार रमेश पाटील व चेतन पाटील यांच्या शिष्टमंडळानेही यावेळी श्री. शेख यांची भेट घेतली. अवैध मासेमारी विरुद्ध कारवाई करणे, सागरी किनाऱ्यावर जेट्टी, मासे उतरविण्यासाठी जागा उभारण्याची त्यांनी मागणी केली.

त्यावर श्री. शेख म्हणाले की, सागरी किनाऱ्यावरील जेट्टी, मासे उतरविण्याच्या जागा विकसित करणे, शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारणे आदी कामे सुरू करण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात ही कामे वेगाने पूर्ण होतील. तसेच कोकण किनारपट्टीवर येत्या काही काळात तीन मोठे लँडिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. तसेच समुद्र किनाऱ्यावरील गाळ काढण्यासाठी विशेष तरतूद करण्याचे निर्देशही श्री. शेख यांनी यावेळी दिले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

विकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत; परंतु नोंदणीसाठी चार महिने मुभा

Next Post

मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत; परंतु नोंदणीसाठी चार महिने मुभा

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,028 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – पालकमंत्री जयंत पाटील

April 17, 2021

संपत राजाराम जाधव यांचे निधन लसीमुळे नाही, जिल्हा आरोग्य विभागाकडून खुलासा

April 17, 2021

ऑक्सिजन, रेमेडिसीव्हरच्या पुरवठ्यावरून ठाकरे सरकारचे निर्लज्ज राजकारण – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

April 17, 2021

तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, सुविधा उभाराव्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

April 17, 2021

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

April 17, 2021

अत्याचारी इंग्रजांना चाप लावणारे चाफेकर बंधू

April 17, 2021

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

April 17, 2021

रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

April 17, 2021

शासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी – दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

April 17, 2021

फलटण तालुक्यातील १६९ तर सातारा जिल्ह्यातील १५४३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३८ बाधितांचा मृत्यु

April 17, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.