दैनिक स्थैर्य । दि.१८ फेब्रुवारी २०२१ । त्रिपुटी । त्रिपुटीतील स्मशानभूमीतील अग्निकुंडच बुधवारी चोरट्यांनी चोरुन नेले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुरुवार दि. १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेलंग पुनर्वसीत गावच्या स्मशानभूमीतील अग्निकुंडाची चोरी झाली होती, सुरुवातीला साधा तक्रारी अर्ज दाखल करुन घेण्यात आला, त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट उपविभागीय पोलीस अधिकार्यांना माहिती दिल्यावर तब्बल पाच दिवसानंतर १५ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करुन घेण्यात आला. त्यात घटनास्थळाचा पंचनामा मात्र १७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५.३० च्या सुमारास करण्यात आला.
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर त्रिपुटी येथे चोरट्यांनी आपली करामत बुधवार दि. १६ फेब्रुवारीच्या रात्री दाखविली. स्मशानभूमीतील अग्निकुंड चोरुन नेले आहे. चोरट्यांच्या घाईगडबडीत बिडाचा मोठा तुकडा तेथेच पडला असल्याचे दिसून आले. कोरेगाव पोलिसांनी मात्र कार्यतत्परता दाखविली आहे, त्यांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला असून, गुन्हा देखील दाखल केला आहे.