शंकरराव कृष्णाजी बोराटे तथा माळी गुरुजी यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 18 फेब्रुवारी 2022 । फलटण । कर्मवीर भाऊराव पाटील तथा आण्णा यांचे जीवन कार्य आदर्श मानून कार्यरत राहिलेले, जुन्या पिढीतील आदर्श प्रा. शिक्षक, शंकरराव कृष्णाजी बोराटे तथा माळी गुरुजी यांचे वृद्धापकालीन आजाराने पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज शुक्रवार सकाळी ६ वाजता वयाच्या ८९ व्या वर्षी दु:खद निधन झाले.

त्यांचे पार्थिव आज दुपारी येथे आणल्यानंतर गजानन चौक, फलटण येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 2 वाजता फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सेवा निवृत्तीनंतरही सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आदर्श विद्यार्थी व त्यातून आदर्श समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या बोराटे गुरुजींनी त्याच भावनेने येथील पत्रकार भवनात पत्रकारांनी सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षा मोफत अभ्यासिकेला आपल्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ हजार रुपयांची पुस्तके भेटी दाखल देवून विद्यादानाचे कार्य अखेरपर्यंतच नव्हे त्यानंतरही अखंडित सुरु राहिल असे प्रयत्न केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!