खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल


 

स्थैर्य, ठाणे, दि.१२ : शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित (Palghar MP Rajendra Gavit)
यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी
संबंधित महिलेने खासदार राजेंद्र गावित यांच्याविरुद्ध पालघर जिल्ह्यातील
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर शिवसेना खासदार राजेंद्र गावि
यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मिरा रोड येथील गॅस एजन्सीत काम करणाऱ्या
महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, गॅस एजन्सीचे मालक गावित यांनी
तिच्यासोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.

तक्रारदार
महिलेने या प्रकरणी शुक्रवारी नया नगर पोलीस ठाण्यात खासदार राजेंद्र
गावित यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी खासदार राजेंद्र गावित
यांच्या विरुद्ध कलम ३५४ ए आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गावितांनी आरोप फेटाळले

महिलेने
केलेल्या गंभीर आरोपांनंतर खासदार राजेंद्र गावित यांनी आरोप फेटाळले
आहेत. गावित यांनी म्हटलं, संबंधित महिलेच्या आरोपात तथ्य नाहीये आणि माझी
प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या महिलेने गॅस एजन्सीमध्ये
पैशांची अफरातफर केली होती आणि त्यानंतर तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले
होते. याचा राग म्हणून तिने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार महिलेचा आरोप

आपल्या
तक्रारीत पीडित महिलेने म्हटलं आहे की, ती गॅस एजन्सीमध्ये काम करते आणि
या गॅस एजन्सीचे मालक खासदार राजेंद्र गावित आहेत. खासदार राजेंद्र गावित
यांनी गैरफायदा घेत माझ्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!