
स्थैर्य, सातारा, दि. 28 : सातारा नगरपालिकेला 1 कोटी 73 लाख 93 हजार 90 रुपयांचे तर कराड नगरपालिकेला 77 लाख 52 हजार 106 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. 15 व्या वित्त आयोगाने लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारे हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या संकटाशी सामना करताना नगरपालिकांच्या तिजोरीवर ताण आला असताना हा निधी मिळत आहे. त्याच्या विनियोगाचे निकष नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, सध्या तरी किमान ज्यासाठी विनियोग करा म्हणून सांगितलेे जाईल, त्या योजनेवरील तेवढी रक्कम अन्य योजनांना उपलब्ध होणार आहे.
सातारा जिल्ह्यात नगरपालिका व नगरपरिषदांना मिळणारा निधी पुढीलप्रमाणे फलटण – 79 लाख 85 हजार 329, रहिमतपूर – 40 लाख 60 हजार 472, म्हसवड – 69 लाख 55 हजार 905, वाई – 52 लाख 60 हजार 617, पाचगणी – 23 लाख 89 हजार 503, महाबळेश्वर – 77 लाख 8 हजार 976, मलकापूर – 48 लाख 37 हजार 773, लोणंद – 36 लाख 16 हजार 188, कोरेगांव – 39 लाख 58 हजार 411, मेढा – 7 लाख 91 हजार 565, पाटण – 21 लाख 87 हजार 538, वडूज – 36 लाख 24 हजार 872, खंडाळा- 16 लाख 52 हजार 759, दहिवडी – 38 लाख 38 हजार 621.