उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य, टॅग नसेल तर दुप्पट टोल लागणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१४:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्ट टॅग अनिवार्य केले आहे. याची अंलबजावणी उद्या 15 फेब्रुरीपासून करण्यात येणार आहे. म्हणजे आज रात्री 12 वाजल्यापासून ही फास्ट टॅग अनिवार्य आहे. फास्ट टॅग नसेल तर उद्यापासून तुम्हाला दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल. याआधी 1 जानेवारी फास्ट टॅग लागू करण्यात येणार होते मात्र सरकारने याची मुदत वाढवून 15 फेब्रुवारी केली होती. देशभरात टोल भरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम FASTag आवश्यक असेल. नॅशनल हायवेवरील कोणताही टोलनाका क्रॉस करण्यासाठी तुम्हाला फास्ट टॅग जरुरी आहे. कॅश ट्रान्झेक्शनच्या तुलनेत फास्ट टॅगमुळे टोल प्लाझामध्ये लागणारा वेळ वाचेल.

काय आहे फास्ट टॅग?

फास्ट टॅग एक स्टिकर आहे जे तुमच्या गाडीच्या विंडस्क्रिनवर लावले जाते. हे स्टीकर कारच्या विंडशिल्डच्या आत लावले जाते. यात बारकोड असतो. डिवाईस रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीचा वापर यात केला जातो जी टोल प्लाझावरील स्कॅनरला कनेक्ट असते. गाडी पास झाल्यानंतर तुमच्या फास्ट टॅग अकाऊंटमधील पैसे कट होतात. फास्ट टॅगला तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डला जोडू शकता. ज्या ज्या ठिकाणी टोल लागेल तेव्हा तुमच्या अकाऊंटमधून पैसे कट होतील.

…तर दुप्पट टॅक्स भरावा लागेल

जर तुमच्या गाडीवर फास्ट टॅग लावले नसेल तुम्हाला मार्शल लेनमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र जर तुम्ही फास्ट टॅगच्या लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या गाडीचा जेवढा टॅक्स असेल त्याच्या दुप्पट टॅक्स भरावा लागेल.

कसे खरेदी कराल फास्ट टॅग?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

किती आहे फास्ट टॅगची किंमत?

फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.

कसे कराल रिचार्ज?

जर फास्ट टॅग एनएचएआय प्रीपेड वॉलेटशी जोडले असेल तर याला रिचार्ज करता येते. हे युपीआय/डेबिट या क्रेडिट कार्ड/NEFT/नेट बँकिंग आदि माध्यमातून रिचार्ज करु शकता. जर बँक खाते फास्ट टॅगशी जोडले असेल तर पैसे खात्यातून कट होतील. तुम्ही पेटीएम वॉलेटला फास्ट टॅगशी जोडल्यास वॉलेटमधून तुम्ही रिचार्ज करु शकता.

वैधता किती?

फास्ट टॅग खात्यात मिनिमम बॅलन्सची अनिवार्यता आता काढून टाकण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करु शकता. फास्ट टॅगची वैधता जारी झाल्यापासून पाच वर्षे आहे. रिचार्ज केल्याने ही वैधता वाढत नाही.


Back to top button
Don`t copy text!