शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवला; ITO जवळ ट्रॅक्टर पलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २६ : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चातील गोंधळ अद्याप सुरूच आहे. शेतकरी बॅरिकेड्स तोडून लाल किल्ल्यावर दाखल झाले आणि खलिस्थान पंथाचा झेंडा फडकवला. शेतकऱ्यांचा एक जत्था इंडिया गेटच्या दिशेने जात आहे. दुसरीकडे ITO जवळ पोलिसांसोबतच्या झडपेत वेगात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटल्याने मृत्यू झाला आहे. नवनीत सिंग असे या मृताचे नाव होते. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.

लाठीचार्ज, दगडफेकीत अनेक शेतकरी व पोलिस जखमी झाले

ITO पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला असता शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या झडपमध्ये अनेक शेतकरी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर वेगाने चालवले असता पोलिसांना मागे हटावे लागले. पोलिसांनी तेथून पळ काढत जवळच्या इमारतींमध्ये गेले आणि तेथून शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केला.

निहंग्यांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला – पोलिसांचा दावा

याआधी गाझीपूर सीमेवरून निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोएडा रोडवर अडवले आणि अश्रुधुराचा मारा केला. शेतकऱ्यांनी देखील पोलिसांवर दडफेक केली आणि काही गाड्यांची तोडफोड केली. दरम्यान शेतकऱ्यांनी पांडवनगर पोलिस पिकेटवर ट्रॅक्टर चढवल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तसेच निहंग्यांनी तलवारीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेला मार्ग शेतकर्‍यांनी तोडला

पोलिस शेतकऱ्यांना म्हणाले होते की, प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर 12 वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढवा. मात्र शेतकऱ्यांना परेड संपण्याआधीच मोर्चा काढला. बॅरिकेड तोडून शेतकरी पुढे सरसावले आणि आता ते पोलिसांनी दिलेल्या मार्गावर देखील जात नाहीत. पोलिस देखील मागे हटली आहे.

मोर्चात एक लाख ट्रॅक्टर असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

पोलिसांनी शेतकऱ्यांना केवळ 5 हजार ट्रॅक्टरसोबत रॅली काढण्याची मंजुरी दिली आहे. मात्र एकट्या सिंघू बॉर्डवर 20 हजारांपेक्षा जास्त ट्रॅक्टर दाखल झाले. याआधी सिंघू, टीकरी आणि गाझीपूरवर सुमारे 1 लाख ट्रॅक्टर जमा होणार असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला होता.


Back to top button
Don`t copy text!