दैनिक स्थैर्य | दि. २६ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळा, करंजखोप येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच सौ. राधिका यशवंतराव धुमाळ, उपसरपंच सौ. रूपाली राजेंद्र धुमाळ, ग्रामसेवक श्री. विठ्ठल सोनवलकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश ढमाळ सर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषीदूत सौरभ दुधाळ, शुभम बेलदार, सुप्रीत लोखंडे, शिवरूप मिंड, सुमित ढोबळे व शुभम दोडमसे यांना हा कार्यक्रम साजरा करून दाखवण्यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉक्टर यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्राचार्य स्वप्निल लाळगे सर तसेच कार्यक्रम समन्वयक प्राचार्य निलिमा धालपे मॅडम व प्राचार्य नितिशा पंडित मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.