स्थैर्य, मुंबई, दि.३१: मराठीतील प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. इलाही जमादार यांच्यावर सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. मराठी भाषेतील प्रसिद्ध गझलकार अशी इलाही जमादार यांची ओळख होती. दिग्गज गझलकार सुरेश भट यांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. मराठी, हिंदी, उर्दू दैनिक आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता व गझल लिहिल्या. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून इलाही जमादार यांची विशेष ओळख होती.