मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यत मुदतवाढ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । सातारा । भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुर्नारिक्षण कार्यक्रमास दि. 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे यांनी दिली आहे.

सातारा जिल्हयातील दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नव मतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी, तसेच स्थलांतरित असल्यास वगळणीसाठी अथवा काही दुरुस्ती असतील तर त्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरिय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे नाव नोंदणीसाठी दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत संपर्क साधता येईल याची कृपया नोंद घ्यावी. तरी आयोगाने दिलेल्या या मुदतवाढीचा जास्तीतजास्त मतदारांनी लाभ घ्यावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!