वीज बिल माफ करा, अन्यथा आसुडाचे फटके; बळीराजाचा सरकारवर ‘प्रहार’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कराड, दि.२४: लाकडाउन काळातील घरगुती वीज बिले माफ करा, अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यास बळीराजा शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून आसुडाचा प्रहार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले.

निवेदनातील माहिती अशी : कोरोनामुळे शेती उत्पादित मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमाल अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली. कंपन्या उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना रोजगार मिळाला नाही. माणसांना दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाले असतानाच महावितरणने अंदाजे वीज बिले वाढवून ग्राहकांना दिली. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडेच मोडले. एकीकडे हाताला काम नाही व दुसरीकडे महावितरणने वाढवून वीज बिले देऊन सर्वसामान्य लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लाकडाऊन काळातील घरगुती वीज बिले सरसकट माफ करावी. 

क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा

ऊर्जामंत्री नितीन राऊत अगोदर वीज बिले माफ करणार असे म्हणतात व आता वीज बिले माफ करणार नाही असे म्हणतात. यामुळे सरकारविरोधात सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करुन लाकडाउन काळातील घरगुती वीज बिले माफ करावी, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्याकडून थकीत घरगुती वीज कनेक्शन तोडणी करायला येणाऱ्या कर्मचाऱ्यास आसुडाचे फटके देणार. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल. निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे, घराळ बापू, मनोज माळी, प्रहार संघटना व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवतीस पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी दोन गटांत तुफान राडा; नऊ जणांना अटक


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!