पोलीस विभागाप्रमाणे उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत होणार गौरव – मंत्री शंभूराज देसाई

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२३ । मुंबई । अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे काम करीत असतात. पोलीस विभागाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील गुणवत्ता पूर्ण कार्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांना पदक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उत्पादन शुल्क विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री देसाई म्हणाले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत गौरव केला की त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. विभागाच्या राज्यस्तरीय गौरव सोहळा कार्यक्रमाबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!