२०२४ ची लोकसभा जिंकण्यासाठी सर्वाना काम करायचंय – अतुल भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदार संघ निवडून त्या मतदार संघात 2024 मध्ये जिंकण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सातारा लोकसभा प्रभारी पदासाठी त्यांची झालेली नियुक्ती ही त्याचाच एक भाग आहे. संपूर्ण लोकसभेसाठी एक टीम तयार करून आपल्याला लोकसभेत विजय प्राप्त करायचा असे प्रतिपादन सातारा लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले यांनी केले. भारतीय जनता पार्टीची सातारा शहर, सातारा ग्रामीण , जावळी, कोरेगाव या चार मंडलामधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वेदभवन मंगल कार्यालय , सातारा या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला प्रदेश सचिव विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, नेते दत्ताजी थोरात, महिला मोर्च्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई पाटील, भटके विमुक्त प्रदेश उपाध्यक्ष रवी पवार, संघटन सरचिटणीस शेखर वडणे, सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, भरत मुळे, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, जावळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, कोरेगाव तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, जिल्हा परिषद सदस्य सौ. अर्चना देशमुख, संदीपभाऊ शिंदे, धनंजय जांभळे, विजय काटवटे, ऍड प्रशांत खामकर, राहुल शिवनामे , मोनाली पवार, रीना भणगे, बाळासाहेब गोसावी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी सर्वप्रथम संघटनात्मक आढावा घेतला. भाजपा सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. पक्षाच्या धोरणात अंत्योदय हा शब्द आहे. याचा अर्थ लोकहीतकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवणे आणि त्यांना याचा फायदा करून देणे हे आपल्या पक्षाचे ध्येय आहे.

केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा लवकरच साताऱ्यात घेणार आहोत. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील लाभार्थी या मेळाव्याला आणावेत त्यांचा सत्कार या मेळाव्यात केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांची सातारा लोकसभा संयोजक म्हणून निवड झाली आहे. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत जिकण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. बूथपर्यंत पदाधिकाऱ्यांनी संपर्क वाढवला पाहिजे. पक्ष कार्य करताना सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल आपणच उडवणार आहोत.


Back to top button
Don`t copy text!