स्थैर्य,नवी दिल्ली, दि २: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी रेल्वे विभागाला पर्यावरणासंदर्भातील सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या अखत्यारितील सर्व परवानग्या मिळाल्याने ५०८ कि.मी.च्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली.
वन्यजीव विभाग, जंगल विभाग आणि किनारी भूप्रदेश संबंधीत महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्याचे अधिका-यांनी सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ६७ टक्के जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. गुजरातमधील ९५६ हेक्टरपैकी ८२५ हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली असून एकून जमीनीच्या ८६ टक्के जमीन अधिग्रहीत झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी दिली. तर महाराष्ट्र राज्यातील ९७ टक्के जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून फक्त ३ टक्के जमीन अधिग्रहण होण्याची बाकी आहे.
समाजाचे नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना, बैठकीनंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
गुजरातमधील प्रकल्पाच्या कामांसाठी ३२ हजार कोटींचे टेंडर काढल्याची माहितीही अधिका-यांनी दिली.कधी धावणार बुलेट ट्रेनहा बुलेट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ३५० किमी प्रतितास वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे अहमदाबाद ते मुंबई हे अंतर सुमारे दोन तासांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी सुमारे सात तास लागतात. मुंबई अहमदाबाद दरम्यान, मालवाहतूक करण्यासाठीही कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येत आहे.