शाहूपुरी चौकातील अतिक्रमणे हटवली

रस्ता रुंदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यवाही

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। सातारा । शाहपुरी चौकातील वेगवेगळ्या कारणास्तव झालेली सहा शेडची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई करून हटवली. येथील रस्ता दीड मीटर रुंद करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री अडीच तास सुरू असणार्‍या या कारवाईमध्ये नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेत बांधकाम विभागाला सहकार्य केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाने मोळाचा ओढा शाहूपुरी चौक ते पुढे खिंडीमार्गे जाणारा मेढा रस्ता रुंद करण्याचे काम सुरू केले आहे. शाहूपुरी चौकामध्ये प्रमाणापेक्षा जास्त अतिक्रमणे झाल्याने येथील वाहतुकीला अडथळा येत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने येथील अतिक्रमण करणार्‍यांना दीड महिन्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. येथील नागरिकांना परत एकदा स्वतः हुन अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आलेे होते काही जणांनी पले अतिक्रमण काडून घेतले. मात्र, काही शेड धारकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान शाहूपुरी पोलीसांचा बंदोबस्तात जेसीबी, डंपर अशा लवाजम्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पंधरा कर्मचार्‍यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सुमारे दोन तास ही कारवाई सुरू होती. येथील सहा शेडचे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात आले. त्यामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी मोठा झाला आहे. काही व्यापार्‍यांनी कर्मचार्‍यांशी चर्चा करून आपली बाजू रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रस्तावित रस्त्याचे मोजमाप घेऊनच बांधकाम विभागाचे अधिकारी उभे होते. त्यामुळे संबंधितांचा नाईलाज झाला. नागरिकांनी येथील अतिक्रमणे स्वतः हुन काढून घेतली. मोळाचा ओढा, शाहूपुरी पोलीस ठाणे, शाहपुरी चौक खिंडमार्गे मेढा शहराकडे जाणारा रस्ता रुंद करण्यात येत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता प्रशांत खैरमोडे यांनी दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!