नर्सिंग कॉलेजच्या बसची इलेक्ट्रिक बॅटरी चोरट्याकडून लंपास


दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथील नर्सिंग कॉलेज कंम्पाउंडच्या आतमध्ये उभ्या असलेल्या आयशर कंपनीच्या बसची इलेक्ट्रिक बॅटरी दि. २९ मार्च २०२४ ते ३० मार्च २०२४ दरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद संदिप भगवान निंबाळकर (वय ४३ वर्षे, रा. तावडी, ता.फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादीच्या संस्थेची आयशर बस (क्रमांक एमएच ११ बीएल ९१८९) ची इलेक्ट्रीक बॅटरी किंमत ७,९०० रुपये ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलिसात फिर्यादी निंबाळकर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक तपास पो. ना. घाडगे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!