एल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे मोठा निर्णय; जुलै २०२७ पर्यंत धरणातील पाणी आरक्षित

वाढत्या एल निनोच्या प्रभावामुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना जुलै २०२७ पर्यंतच्या पाण्याचे बजेट आणि नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २८ सप्टेंबर : प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या एल निनोचा प्रभाव आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षाच्या पावसावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी सर्व जिल्ह्यांना जुलै २०२७ पर्यंतच्या पाण्याच्या गरजेचा अंदाज घेऊन ‘वॉटर बजेट’ तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

जिल्हानिहाय ‘वॉटर बजेट’ तयार करण्याचे आदेश

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील गरज यांचा ताळमेळ घालण्यासाठी तालुका व जिल्हानिहाय नियोजन केले जाणार आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तेथून प्रथम जुलै २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखून ठेवला जाईल. धरणांमध्ये अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध असल्यास त्याचा वापर रब्बी पिके किंवा उद्योगांसाठी करण्याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल.

एल निनोचा प्रभाव आणि सरकारी तयारी

तज्ज्ञांच्या मते एल निनोचा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ चालू वर्षापुरते मर्यादित न राहता पुढील वर्षाच्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात आधीच २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून टंचाईसदृश भागात टँकर आणि पाणी पुरवठ्याचे नियोजन वेगाने सुरू आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!