
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 30 जानेवारी, सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे शनिवारी (ता. 31) उंब्रज व तांबवे येथे आयोजन केले आहे. शेंद्रे, नागठाणे, पुसेसावळी, पाल, मसूर, उंब्रज, सैदापूर व वारुंजी, तांबवे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभांचे आयोजन केले आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव, शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख रेश्माताई जगताप आदी मान्यवर सभांना उपस्थित राहतील. शनिवारी दुपारी दोनला उंब्रज येथे बाजारतळावर, तर दुपारी तीनला तांबवे येथे शाळेच्या क्रीडांगणावर सभा होणार आहे.
