स्थैर्य, दि.६: मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. यात, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. यासोबतच नुकतंच भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन यादी सुपूर्द केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन या नावांची शिफारस करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या नावांची शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 नावांच्या शिफारशी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे केली.
- राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे
राजू शेट्टी
यशपाल भिंगे
आनंद शिंदे
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रजनी पाटील
सचिन सावंत
मुझफ्फर हुसेन
अनिरुद्ध वनकर
- शिवसेना
उर्मिला मातोंडकर
चंद्रकांत रघुवंशी
विजय करंजकर
नितीन बानगुडे पाटील