स्थैर्य,बीजिंग,दि.१९: लडाखच्या गलवान घाटात लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) वर भारतीय सैन्यासोबत झालेल्या संघर्षामध्ये चीनी लष्करातील 5 सैनिकांचा मृत्यू झाला होता. चीनने जवळपास 8 महिन्यानंतर याचा खुलासा करत त्यांची नावे प्रकाशित केली आहेत. गलवानमध्ये गेल्या वर्षी 15-16 जून च्या रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजीत संघर्ष झाला होता. यामध्ये भारताच्या कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवान शहीद झाले होते.
चीनच्या सरकारी मीडियाने सांगितले की, सेंट्रल मिलिट्री कमीशनने शुक्रवारी मान्य केले की, काराकोरम माउंटेनवर तैनात 5 फ्रंटियर ऑफिसर्स आणि सोल्जर्सचा भारतासोबतच्या संघर्षात मृत्यू झाला होता. देशाच्या संरक्षणात त्यांच्या योगदानासाठी त्यांची स्तुतीही करण्यात आली.
मृतांमध्ये रेजिमेंटल कमांडर यांचाही समावेश आहे
चीनी सैन्याचे ऑफिशियल न्यूज पेपर PLA डेलीनुसार, सेंट्रल मिलिट्री कमीशनने या सैनिकांना हीरोजा दर्जा दिला आहे. यामध्ये शिनजियांग मिलिट्री कमांडचे रेजिमेंटल कमांडर क्यूई फेबाओ यांना हीरो रेजिमेंटल कमांडर ऑफ डिफेंडिंग द बॉर्डर, चेन होंगजुन यांना हीरो टु डिफेंड द बॉर्डर आणि चेन जियानग्रॉन्ग, जियाओ सियुआन आणि वांग जुओरनला फर्स्ट क्लास मेरिटचा दर्जा देण्यात आला आहे.
अवॉर्ड देताना गलवानचा घटनाक्रमही सांगितला
या अधिकारी आणि सैनिकांच्या मृत्यूला चीनने प्रथमच स्वीकारले आहे. आतापर्यंत चीन गलवानमध्ये जखमी आणि मरण पावलेल्या सैनिकांची संख्या लपवत होता. पाच सैनिकांना पुरस्कार देताना गलवानमधील घटनाक्रमही सांगण्यात आला.
चीन्या पीपुल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने सांगितले की, LAC वर कसे भारतीय सैन्याने मोठ्या संख्येत सैनिक तैनात केले होते. त्यांनी दावा केला की, भारतीय सैनिक चीनी सैन्याला मागे हटवण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान सैनिकांनी स्टील ट्यूब, लाठ्या आणि दगडांनी हल्ला करत देशाच्या सार्वभौमत्वाचा बचाव केला.
भारतावर टाकली संघर्षाची जबाबदारी
दोन्ही देशांमध्ये जवळपास 45 वर्षात ही सर्वात मोठी चकमक होती. पहिले मानले जात होते की, चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. PLA ने या संघर्षासाठी भारताला जबाबदारी धरले आहे. त्यांनी म्हटले की, एप्रिल 2020 नंतर विदेशी सैन्याने मागच्या कराराचे उल्लंघन केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत रस्ते आणि पूल निर्माण केले. सीमेवर जाणीवपूर्वक आपली स्थिती बदलत त्याने कम्युनिकेशनसाठी पाठवलेल्या चिनी सैन्यांवर हल्ला केला.