सासकल येथे ‘ई-पीक पाहणी’ प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना थेट बांधावर मार्गदर्शन

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत; कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सासकल, दि. ०५ सप्टेंबर : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘ई-पीक पाहणी’ शेतकऱ्यांना सहजपणे करता यावी, या उद्देशाने सासकल, ता. फलटण येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी मोहन मुळीक यांच्या शेतातील फळ पिकाची नोंदणी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपमध्ये यशस्वीरीत्या करण्यात आली.

या उपक्रमावेळी ‘कृषी सेवा रत्न’ सचिन जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी ॲपद्वारे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या नोंदणीमुळेच पीक कर्ज, फळपीक कर्ज, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे शक्य होते.”

खरीप हंगाम २०२५ साठी ई-पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ आहे. सर्व शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘DCS’ मोबाईल ॲपचे नवीन व्हर्जन घेऊन वेळेपूर्वी आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहनही सचिन जाधव यांनी केले. या उपक्रमाला गावातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!