स्थैर्य, फलटण दि. १६ : गेल्या ४०/४५ दिवसापासून सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम वेगात सुरु असून यावर्षी ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने संपूर्ण ऊसाचे गाळप करताना साखर कारखान्यांची दमछाक होणार असल्याचे दिसून येते. आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाने (श्रीराम सहकारी साखर कारखाना) १ लाख ३८ हजार ३० मे. टन ऊसाचे गाळप करुन १ लाख ५० हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.०१ %, श्री दत्त शुगर इंडिया, साखरवाडी यांनी १ लाख ३० हजार ४४१ मे. टन ऊसाचे गाळप करुन १ लाख ३९ हजार ५५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.०० %, माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ३ लाख ३४ हजार ०८३ मे. टन ऊसाचे गाळप करुन ३ लाख २९ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.१२ %, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २ लाख ८४ हजार ६९५ मे. टन ऊसाचे गाळप करुन २ लाख ८७ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.२१ %, छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २ लाख ७८ हजार २२२ मे. टन ऊसाचे गाळप करुन २ लाख ५९ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.८१ %, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने १ लाख ७४ हजार १० मे. टन ऊसाचे गाळप करुन १ लाख ७० हजार ६४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ९.९६ %, कृष्णा सहकारी साखर कारखान्याने २ लाख ६९ हजार ८१० मे. टन ऊसाचे गाळप करुन ३ लाख ८ हजार ७४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.२१ %, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने २ लाख ६५ हजार २०० मे. टन ऊसाचे गाळप करुन २ लाख १४० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.९३ %, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ५५ हजार २९० मे. टन ऊसाचे गाळप करुन ५७ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.१४ %, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, हुपरीने ४ लाख २ हजार ६३० मे. टन ऊसाचे गाळप करुन ५ लाख ५१ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.१६ %.