पशु संरक्षण कायद्या अंतर्गत कुरेशी नगरमध्ये पोलिसांची कारवाई; ₹ ५ लाख ८० चा माल जप्त


 

स्थैर्य, फलटण दि.१६: स्वतःच्या फायद्यासाठी जनावरांची कत्तल करून त्याचे मास तसेच ८ गाई कत्तल करण्याच्या हेतूने पिकअपमध्ये भरत असताना पोलिसांनी छापा टाकून कुरेशीनगर, फलटण येथील ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या  मिळालेली माहिती अशी की, आरोपी जमील मेहबूब कुरेशी,  वय ४२, राहणार कुरेशी नगर, सद्दाम हसीम कुरेशी, वय २७, अरशद जुबेर कुरेशी, वय २५, हुसेन बालाजी कुरेशी, वय ५५, तय्यब आदम कुरेशी,  वय ४३, अमजद नजीर कुरेशी (सर्व राहणार कुरेशी नगर,फलटण), नागनाथ चन्नाप्पा नागेशी, वय ३२, मल्लिकार्जुन लक्ष्मण चौगुले, वय २५ (दोघे राहणार वळचन, जिल्हा सोलापूर) हे स्वतःचे फायद्याकरिता जनावरांची कत्तल करून मांस पिकअपमध्ये भरत असताना व नजीक ४ गिर गाई, ४ गिर खोंड  जनावरे कत्तल करण्याच्या हेतूने दाटीवाटीने  डांबून ठेवल्याचे मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल नितीन चतुर यांच्या फिर्यादीवरून वरील 8 जणांविरोधात कलम -411/2020  महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 9(अ)(ब) 5 (ब) प्राणी छळ अधिनियम 11 अनवये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून पिकअप, मांस, 8 जनावरे, मोबाईल, चाकू असा 5,80,000 चा माल जप्त केला आहे.

अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सोनवलकर करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!