दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
कोळकी येथील तुलसी अॅक्सिडेंट हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर मद्यपी कारचालकाने (क्र.एमएच-०९-एफवी-८४१२) दोन दुचाकींना (क्र. एमएच-११-बीपी-३९५५ व एमएच-११-डीके-९४४८) धडक दिल्याने दुचाकीवरील फिर्यादी तुलसीराम वणाराम देवासी (वय ३२, रा. कोळकी, फलटण) हे व अन्य एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
या प्रकरणी मद्यपी कारचालक रोहित यशवंत पवार, रा. शिरोली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघात प्रकरणी अधिक तपास म.पो.ना. हेमा पवार करीत आहेत.