नागठाणेत दारूच्या नशेत युवकाची आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, पाटण, दि.१२:  दारूच्या नशेत पाडळोशी (ता.पाटण) येथील युवकाने नागठाणे (ता.सातारा) येथे आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.अजय रामचंद्र ढेरे( वय.३२,रा.मूळ रा.पाडळोशी,ता.पाटण,हल्ली रा.सातारा) असे या युवकाचे नाव आहे.

अजय ढेरे हा पत्नीसह सातारा येथे राहत असून तो वाहनचालक म्हणून काम करत होता.त्याला दारू प्यायचे व्यसन होते.नागठाणे येथे त्याचा मावसभाऊ आकाश निकम राहत असून अजय ढेरेचे वरचेवर येणे-जाणे होते.गुरुवारी सकाळी अजय ढेरे हा नागठाणेत आला होता.

मावभावाकडे जेवण करून पुन्हा सातारा जाण्यासाठी रात्री निघाला.तो दारू पिला होता.शुक्रवारी सकाळी आकाशच्या घराजवळ असलेल्या राजदीप रांजणे यांच्या मालकीच्या खताच्या गोडाऊन जवळील शेडच्या छताच्या लोखंडी अँगल ला दोरीच्या साहाय्याने अजय ढेरे याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.याची फिर्याद मावसभाऊ आकाश नारायण निकम याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास साहाय्यक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!