सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी


स्थैर्य, मुंबई, दि. ०५ : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्स अँगलने तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने शुक्रवारी मुंबईतील NDPS कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. 12 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकसह 33 आरोपींची नावे आहेत. तसेच, 5 जण फरार असल्याची माहिती आहे. या चार्जशीटमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या साक्षींचा समावेश आहे.

चार्जशीटसोबत 50 हजार पानांचे डिजिटल पुरावे आहेत. यात आरोपींमध्ये झालेली व्हॉट्सअॅप चॅट, त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंटचा समावेश आहे. याशिवाय, 200 पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी यात आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत 33 जणांना अटक

या प्रकरणात NCB ने आतापर्यंत 33 जणांना अटक केली आहे. यात अभिनेत्री रिया, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सॅमुअल मिरांडा, दीपेश सावंत आणि इतर ड्रग पेडलर सामील आहेत. या प्रकरणातून मिळालेल्या पुराव्यावरुन NCB ने बॉलिवूडमधील इतर काही प्रसिद्ध अभिनेत्यांची चौकशीदेखील केली होती.

सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये अजून मोठी नावे असू शकतात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मुख्य चार्जशीटच्या तीन महीन्यानंतर NCB एक सप्लीमेंट्री चार्जशीट न्यायालयात सादर करू शकते, ज्यात बॉलिवूड सेलेब्रिटीजची नावे असू शकतात.


Back to top button
Don`t copy text!