फलटण तालुक्यात ड्रोनद्वारे चोरीचे प्लॅन?; ग्रामीण भाग चोरट्यांच्या रडारवर

फलटणमध्ये हायटेक चोरीचे प्रयत्न


दैनिक स्थैर्य | दि. 03 जुन 2024 | फलटण | फलटण शहराच्या ग्रामीण भागामध्ये चोरी करण्याचे प्रयत्न चोरट्यांकडून सुरू झाले असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत फलटण तालुक्यातील खुंटे, जिंती परिसरामध्ये चोरट्यांकडून परिसराची ड्रोनने पाहणी केली जात आहे.

काल बारामती तालुक्यामध्ये चोरट्यांनी अशाच प्रकारे ड्रोनच्या माध्यमातून चोरी केली असल्याची घटना घडली असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.

काळाप्रमाणे आता चोरटे सुद्धा हायटेक झाले असून ग्रामीण भागातील परिसरामध्ये ड्रोन उडवून त्या माध्यमातून परिसराची पाहणी करत आहेत. कोठे पहारेकरी आहेत? कोठे गस्त घालत आहेत? तर कोणत्या ठिकाणी कोणीच नाही; याची पाहणी चोरटे ड्रोन साहाय्यातून करून मग त्या ठिकाणी जाऊन त्यांना मारण्याचा बेत आखत असताना दिसत आहे.

अशा प्रकारच्या हायटेक चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून सुद्धा उपाय केले जात आहेत. तर पोलीस यंत्रणा सुद्धा ग्रामीण भागामध्ये गस्त घालत आहेत. परंतु चोरट्यांनी लढवलेल्या अनोख्या शकली मागे पोलीस काय भूमिका घेणार ? याकडे आता फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!