मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१२: ‘डीआरडीओ’ म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास विभागाने शालेय विद्यार्थीनींसाठी शिष्यवृतीची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत विद्यार्थीनींना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल.BE/B.TECH या M.TECH/ME च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज दाखल करु शकतात.

या योजनेच्या माध्यमातून अंडर ग्रेजुएटच्या मुलींना वर्षाला 1 लाख 20 हजार रुपये तर पोस्ट ग्रेजुएटच्या विद्यार्थीनींसाठी 1लाख 86 हजार रुपयांची स्कॉलशिप देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 40 जागा असून 30 जागा या BE/B.TECH आणि 10 जागा M.TECH/ME च्या विद्यार्थीनींसाठी आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डीआरडीओने 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. यापूर्वी दोनवेळा स्कॉलरशिपच्या अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेमध्ये बदल केला होता. 

बीई, बीटेक, एमई, एमएससी आणि एमटेकसोबतच गेट आणि जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनी देखील या स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात. डीआरडीओकडून प्रत्येकवर्षी विद्यार्थीनींसाठी ही शिष्यवृती दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थींना 4 किंवा त्यापेक्षा कमी वर्षाच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. जेईई परीक्षासह ज्या विद्यार्थींनी 2020-21 शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला आहे त्यांनाच अर्ज करता येईल. एमई, एमएससी इंजिनिअरिंग आणि एयरोनॉटिक इंजिनियरिंग, एमटेक च्या विद्यार्थींनींसाठी 10 स्कॉलरशिपचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!