
दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
अलगुडेवाडी (ता. फलटण) येथील डॉ. प्रवीण पोपटराव निकम यांच्या कन्या डॉ. प्रतिमा प्रवीण निकम यांचे डेंग्यूच्या उपचारादरम्यान सांगली येथे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर बुधवार, दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता अलगुडेवाडी येथे अंत्यसंस्कार झाले.
डॉ. प्रतिमा निकम ही गेली सहा वर्षे कर्नाटक येथील मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएस करीत होती. सध्या तिची इंटरशीप पूर्ण झाली होती आणि १३ ऑगस्ट २०२४ रोजी तिला ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान केली जाणार होती, पण नियतीचा खेळ मात्र वेगळाच होता. ११ ऑगस्ट रोजी तिला डेंग्यूच्या संसर्गाने घेरले आणि उपचारादरम्यान ती कोमामध्ये गेली. ज्या दिवशी तिचा डॉक्टर पदवी स्वीकारण्याचा क्षण आला, त्याच दिवशी ईश्वराने तिला स्वत:कडे बोलावून घेतले.
डॉ. प्रतिमा यांना त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.