
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 26 मे 2023 | फलटण | फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांची पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रकाशित करण्यात आला आहे. फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याची जागा सध्या नियुक्तीवर ठेवण्यात आली आहे; त्यामुळे आगामी काही दिवसात फलटण पंचायत समितीमध्ये नक्की कोण गटविकास अधिकारी म्हणून येणार याची उत्सुकता आता लागू राहिलेली आहे.
