फलटण येथील डॉ. रोहन अकोलकर यांना ‘हारवर्ड वर्ल्ड रेकॉर्ड’ चा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२३ | फलटण |
फिफा फूटबॉल स्पोर्ट्स मेडिसिन एक्स्पर्ट तसेच फिफा फूटबॉल ऑलिम्पिक मेडिकल कमिटीचे मेंबर फलटण येथील डॉ. रोहन अकोलकर यांना २०२२ या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हारवर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड यांचेवतीने ’हारवर्ड वर्ल्ड रेकॉर्ड’ चा सन्मान मिळाला आहे. जगभरातील फिफा स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्टमधून डॉ. अकोलकर यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

याअगोदर २०१८ साली रशिया येथे पार पडलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्येही डॉ. अकोलकर यांनी फिजिओथेरपीस्ट म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कतार येथे पार पडलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ मध्ये फिफाने ‘बॅकअप मेडिकल टीम’ ही व्यवस्था केली होती. तातडीने वैद्यकीय व्यवस्था आवश्यक असेल तिथे हे पथक उपलब्ध होते. या टीममध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर्सचा समावेश होता. सदर पथक फूटबॉलपटूंना गंभीर स्वरूपाच्या दुखापती किंवा इजा झाल्या तर त्यावर त्वरीत उपाय करीत होते.

डॉ. रोहन यांचा फिफा प्रमाणित फुटबॉल स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञ म्हणून प्रशंसनीय ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यांनी झुरिक, स्वित्झर्लंड येथून फिफा स्पोर्टस् मेडिसीन, सिंगापूर येथून स्पोर्ट मेडिसीनमध्ये पीएचडी, फिनलंड येथून फेलोशीप पेडियाट्रिक्सचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते फलटण व बारामती येथे स्थिरस्थावर झाले आहेत. सदर कामगिरीबद्दल डॉ. रोहन अकोलकर यांचे क्रिडा, वैद्यकीयसह विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्र परीवाराकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!