दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२३ | फलटण |
काठियावाडी रूखी समाज विकास मंडळ फलटण यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
काठियावाड़ी रूखी समाज विकास मंडळ फलटण यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त लहान मुलांना मिठाई, वह्या पेन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे वाटप प्रमुख पाहुणे समाजसेवक श्री. संदीप चोरमले व तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, राजू मारूडा, देवदास वाळा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. मनोज मारूडा, मंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वाघेला, सचिव श्री. नितीन वाळा, कार्याध्यक्ष आनंद डांगे, खजिनदार सारंग गलियल, श्री. निखिल वाळा, श्री. सूरज मारूडा, श्री. अनिल डांगे तसेच महिला पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.