डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत मध्ये विविध उपक्रमातून जयंती साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२३ । बारामती । डॉ बाबासाहेब आंबेडकर एक विचार या विषयावर वक्तृत्व कला स्पर्धा, डॉ आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होणे साठी पुस्तके वाटप, वृक्षरोपण साठी रोपटे वाटप व लाडू वाटप आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे व सहकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. या वेळी मा. नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, मा. उपनगराध्यक्ष,अभिजित जाधव, भारत अहिवळे , शुभम अहिवळे, बबनराव लोंढे,धनंजय तेलंगे, आर पी आय चे सचिव ऍड सुनील शिंदे,मातंग एकता आंदोलन चे पुणे जिल्हा अध्यक्ष राजू मांढरे व ऍड अमृत नेटके,प्रा शिंदे ,प्रा इंगळे, शेलार सर, खंडाळे सर, आवारे सर, भाऊसो घोलप, संतोष खंडाळे, घेरे सर, विनोद शिंदे, पत्रकार निलेश जाधव, चेतन शिंदे, तैनूर शेख, व सूरज कुचेकर, दादासो भिसे, माणिकराव अडागळे, अमोल अडागळे, व इतर मान्यवर उपस्तीत होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बालवयापासून रुजवावेत या साठी पुस्तकालय सारखे उपक्रम सुरू करून वक्तृत्वकला, वृक्षारोपण साठी सहकार्य ,व्यसन मुक्ती आदी माध्यमातून बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेले कार्य बिरजू मांढरे करीत आहेत ही बाब कौतुकास्पद असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले. शिका संघटित व्हा व संघर्ष करा या विचारातून विविध महापुरुषाच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवून आंबेडकर वादी विचार तळागाळात पोचविण्याचे छोटेसे कार्य सर्वांच्या सहकार्याने करीत असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले. सायली चव्हाण, अंजली दिवटे, अंकिता दिवटे यांना वक्तृत्वकला बदल सन्मानित करण्यात आले . या प्रसंगी प्रा. इंगळे, प्रा शिंदे आदींनी विचार व्यक्त केले . सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!