ब्राह्मण गल्लीतील डीपी शिफ्ट होणार; आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजिवराजेंच्या हस्ते कामाचे शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 03 ऑक्टोबर 2024 | फलटण | फलटण शहरातील ब्राह्मण गल्ली येथे असणाऱ्या महावितरणचा डीपी शिफ्ट करण्यासाठी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून रू. 18 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ फलटणचे आमदार दीपक चव्हाण व जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. सदरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेविका सौ. प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

यावेळी ब्राह्मण गल्लीसह फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग नंबर ६ मधील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!