
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । खटाव । खटाव तालुक्यातील विसापूर गावात एका 70 वर्षीय हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीचा मर्डर झाला असल्याची भयंकर घटना घडल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या मर्डरची नोंद पुसेगाव पोलीस ठाणे मध्ये झाली आहे.
घटनास्थळावरून व गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध पती-पत्नी हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम यांचा खून दोन दिवसापूर्वीच झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घराच्या बाहेर दरवाज्याला कडी होती घरातून दोन दिवस कोणतीच हालचाल होत नसल्याने शेजारच्या घरातील नागरिकांनी निकम यांच्या घराची कडी उघडली बघताय तर काय दोन्हीही पती-पत्नीचे मृतदेह निपचित जमिनीवर पडलेले होते.
पती-पत्नीच्या मृतदेहाच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कमल हनुमंत निकम यांच्या गळ्यातील दागिने देखील लांपस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना सायंकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पुसेगाव पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळावर आले घटनास्थळावरून पंचनामा केला व त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी सातारा येथे हलवण्यात आले.
या संदर्भात हा डबल मर्डर नेमका कोणी व कोणत्या कारणासाठी झाला याचा मुळातून तपास सुरू आहे.





