वारकर्यांची गैरसोय होईल असे वागू नको : संदीप म्हेत्रे


दैनिक स्थैर्य । दि. 28 जुन 2025 । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण मुक्कामी येत आहे. यामध्ये वाहतुकीचे नियंत्रण करण्याचे कामकाज आरटीओकडे आहे. यामध्ये कोणत्याही वारकर्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होईल, असे वर्तन करू नको, असे स्पष्ट निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिले आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दैनिक स्थैर्यशी बातचीत करताना याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना म्हेत्रे म्हणाले की, आषाढी वारीच्या काळामध्ये संपुर्ण परिवहन विभाग हा वारकर्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे. काल तरडगाव मुक्कामी पालखी असताना माझ्यासहीत संपुर्ण परिवहन विभाग हा कामकाज करित होता. यासोबत आत्ता सुध्दा फलटण येथे आमचा विभाग हा वारकर्यांच्या सेवेसाठी कामकाज करित आहे. कन्ट्रोल विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी येणार्या सुचनांच्या नुसार आमचे पथक कामकाज करित आहे.

वारकर्यांना वाईट वाटेल किंवा वारकर्यांशी गैरवर्तन होईल, असे कोणताही अधिकारी यांनी वर्तन केले तर त्या अधिकार्यांच्या वर कारवाई करण्यात येईल, असे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!