‘जैन सोशल ग्रुप’कडून डॉक्टरांचा सन्मान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । फलटण । 1 जुलै आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून येथील जैन सोशल ग्रुपच्यावतीने फलटणमधील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

सन्मानपञ, मोत्याची माळ व श्रीफळ असे सत्काराचे स्वरुप होते. यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ.सुर्यकांत दोशी, ,सचिव श्रीपाल जैन, खजिनदार प्रितम शहा, माजी अध्यक्ष डॉ.संतोष गांधी, राजेंद्र कोठारी, माजी सचिव डॉ.ऋषीकेश राजवैद्य उपस्थीत होते.

कोवीड महामारीमध्ये डॉक्टरांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे जैन सोशल ग्रुपच्यावतीने सांगण्यात आले.

सत्काराबद्दल डॉक्टरांनी जैन सोशल ग्रुपला धन्यवाद दिले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!