केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट : 30.67 लाख कर्मचाऱ्यांसाठी 3737 कोटींचा बोनस मंजूर, दसऱ्यापूर्वी खात्यात येतील पैसे


 

स्थैर्य, दि.२१: केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये बुधवारी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कॅबिनेटने 2019-20 साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड आणि नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजूरी दिली आहे. यामुळे केंद्राच्या 30.67 लाख नॉन-गजेटेड कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दसऱ्यापूर्वी बोनसची सर्व रक्कम दिली जाईल.

सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेटच्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बोनसवर 3,737 कोटी रुपये खर्च येईल. बोनस बँक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल.

मीडल क्लासच्या हाता पैसा आल्याने सणांच्या सीजनमध्ये मागणी वाढेल


ज्यांना बोनसचा फायदा मिळणार आहे त्यामध्ये रेल्वे, पोस्ट ऑफिस, डिफेंस, EPFO आणि ESIC सारख्या संस्थानांचे 16.97 लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस दिला जाील. इतर 13.70 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंसस्ड बोनस मिळेल. सरकारने हा निर्णय घेतला कारण सणांच्या सीजनमध्ये लोक जास्त खर्च करु शकतील. सरकारचे म्हणणे आहे की, मीडल क्लासच्या हातात पैसा गेल्याने बाजारात मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!