वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्यांत 300 टक्के वाढ, यावर्षी एकूण नोकऱ्यांत अशा नोकऱ्यांचे योगदान चौपट वाढले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१०: न्यू नॉर्मलअंतर्गत कंपन्या आता आपल्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. याअंतर्गत वर्क फ्रॉम होमसाठी केल्या जाणाऱ्या नोकरभरतीत आधीच्या तुलनेत ३०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जॉब पोर्टलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

कोरोना संकटादरम्यान जगभरातील नोकर भरतीत आणि काढून टाकण्यात बदल झाला आहे. अहवालानुसार, या वर्षी एकूण नोकऱ्यांत वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्यांच्या योगदानात चौपटीपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, एप्रिलच्या सुरुवातीपासून बहुतांश लोक वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्या शोधत आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या पाच महिन्यांदरम्यान नोकरी डॉट काॅमच्या पोर्टलवर ज्या नोकऱ्यांचा शोध घेतला गेला, त्यात वर्क फ्रॉम होमचा शब्द अव्वल राहिला. अन्य अहवालातूनही हे समोर आले की, वर्क फ्रॉम होमच्या नोकरीसाठी अर्जात सातपट वाढ झाली आहे.

नोकरी डॉट कॉमचे चीफ बिझनेस ऑफिसर(सीबीओ) पवन गोयल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांदरम्यान वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले आहे. कोरोना महामारीदरम्यान जगात याच्या वृद्धीत अनेक पट वाढ झाली आहे. मात्र, कार्यालये कायम राहतील. दुरून काम करण्याच्या (रिमोट वर्किंग) वाढत्या मान्यतेमुळे आगामी काळात एक हायब्रिड वर्किंग मॉडेलसाठी मार्ग प्रशस्त करेल.

मोठ्या संख्येत कंपन्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिससोबत घरातून काम करण्यास परवानगी देतील. गोयल यांच्यानुसार, पारंपरिक कार्यालय आधारित किंवा ऑन ग्राउंडच्या नोकऱ्या केवळ सेल्स/बिझनेस डेेव्हलपमेंट आणि कस्टमर केअर एजंट्सना आता कंपन्यांकडून वर्क फ्राॅमचा प्रस्तावही दिला जात आहे.

वर्क फ्रॉम होममध्ये ५०% योगदान बीपीओ/ आयटीईएस क्षेत्राचे

घरातून काम करणाऱ्या नोकरीत सुमारे ५० टक्के योगदान बिझनेस प्रोसेस आऊट सोर्सिंग(बीपीओ)/ आयबी एनेबल्ड सर्व्हिसेस(आयटीईएस) क्षेत्राचे आहे. या कारणास्तव उद्योग जगतात वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्यांत मोठी वृद्धी पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे, यामध्ये आणखी २५ टक्क्यांचे योगदान आयटी सॉफ्टवेअर, शिक्षण/ शिकवणी आणि इंटरनेट/ ई-कॉमर्स देत आहेत. वर्क फ्रॉम होम जॉब्ससाठी पब्लिशिंग, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स(बीएफएसआय) क्षेत्रही समोर आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!