कंगनाचे ऑफिस पाडणे अनावश्यक होते; शरद पवारांनीही टोचले शिवसेनेचे कान


 

स्थैर्य, मुंबई, दि.१०: बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौतचे कार्यालय अनधिकृत बांधकामामुळे मुंबई महापालिकेने हातोडा उगारला. यामुळे शिवसेना आणि कंगना वाद आता आणखी चिघळला असून या कारवाईवर आता भाजपासह राष्ट्रवादीनेही प्रश्न उपस्थित केला आहे.

शरद पवार यांनी सांगितले की, कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई अनावश्यक होती. तिला बोलण्यासाठी आता संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिका-यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल.

प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगनासारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडीचे सरकार आहे, तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा ताबा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!