स्थैर्य, सातारा, दि. २० : गुरुवारी एका दिवसात 337 नव्याने कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर आठजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच 260 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 681 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. गुरुवारी एकाच दिवसात 337 नव्याने कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्याचा आकडा नऊ हजारी पार होत 9008 वर पोहोचला आहे. या 337 बाधितांचा विस्तृत तपशील उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. तसेच उपचारादरम्यान 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 277 झाली आहे. याचबरोबर 260 नागरिकांना जिल्ह्यातील विविध रुग्णालये तसेच कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 4 हजार 918 झाली आहे. याचबरोबर 681 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 33, खंडाळा तालुक्यातील 29, खटाव तालुक्यातील 16, कोरेगाव तालुक्यातील 34,महाबळेश्वर तालुक्यातील 10, पाटण तालुक्यातील 13, फलटण तालुक्यातील 27, सातारा तालुक्यातील 83, वाई तालुक्यातील 14 असे एकूण 260 नागरिकांचा समावेश आहे.
8 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे चौधरवाडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, सासपडे ता. सातारा येथील 67 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, भाकरवाडी ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष या 4 कोरोना बाधितांचा तसेच सातारा येथील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गजवडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील 73 वर्षीय पुरुष व चिमणपूरा पेठ येथील 35 वर्षीय पुरुष व कराड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये बनवडी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 8 कोरोना बाधितांचा मृत्यु उपचारादरम्यान झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
681 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 19, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 91, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगाव 14, वाई येथील 50, खंडाळा येथील 46, रायगाव 58, मायणी येथील 78, महाबळेश्वर येथील 50, पानमळेवाडी 63, पाटण येथील 8, दहिवडी 26, खावली येथील 48 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 97 असे एकूण 681 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.