दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्या भवन प्राथमिक शाळा, फलटण येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली. नव्याने प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ, चॉकलेट आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच इ. १ ली ते ७ वीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष शांताराम आवटे, प्रथामिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष रविंद्र बर्गे, माध्यमिक विभागाच्या शाळा समिती अध्यक्षा सौ. अलका बेडकिहाळ, उद्योजक बाहुबली गांधी, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, बालवाडीच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवले यांची उपस्थिती होती.
भारती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या गणित पूर्वप्रथम परीक्षेत इ. ५ वीतील विद्यार्थिनी पूर्वा अमित भोई हिने राज्यात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच इ.५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुश्री मोहन पवार ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल उपस्थित संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विजया भोसले, अशोक सस्ते यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, अलका बेडकिहाळ यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि दूरदर्शनपासून दूर राहून शालेय शिक्षणातून अधिकाधिक ज्ञान संपादन करण्याचा सल्ला दिला आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील शालेय आराखडा याविषयाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. हेमलता गुंजवटे यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.
याप्रसंगी पूर्वा भोई हिचे अभिनंदन रविंद्र बेडकिहाळ, शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, अलका बेडकिहाळ, मनीष निंबाळकर यांनी केले.