
दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । बारामती । शासनाच्या सूचनेनुसार शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवार दि 15 जून रोजी वंजारवाडी मधील जिल्हा परिषद शाळे मध्ये विध्यार्थी चे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तर ग्रामपंचायत उपसरपंच विनोद चौधर यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी ग्रामपंच्यात सरपंच किरणताई जगताप, उपसरपंच विनोद चौधर व मुख्यध्यापिका सुरेखा भालेराव, सह शिक्षक, सौ शुभांगी ढगे,राजाराम गाडेकर,सौ पुष्पा खोमणे, श्रीमती वनिता भुतकर श्रीमती संगिता शिंदे, श्रीमती वैशाली कांबळे व बंडु खोबरे, रणजित जगताप, अशोक सूर्यवंशी उपस्तित होते.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने आनंद वाढतो पटसंख्या वाढती व शिक्षणाबद्दल आकर्षण वाढते यामुळे सामाजिक बांधलकी म्हणून सदर साहित्य वाटप केल्याचे विनोद चौधर यांनी सांगितले