सातारा पालिका शिक्षण मंडळ आदर्श शिक्षक पुरस्काराचे आज वितरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । सातारा ।  सातारा पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण सोहळा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी येथील शाहू कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे सांगलीचे समाज परिवर्तन कार आणि युवा व्याख्याते वसंत बाबुराव हंकारे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे सातारा पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांची कार्यक्रम सोहळ्याला उपस्थिती आहे

या संदर्भातील माहिती नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मारुती भांगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे तानाजी दत्तू मस्के नगरपालिका शाळा क्रमांक 11, शैला राजेश तिरमारे शाळा क्रमांक 16, शिल्पा सतीश कांबळे शाळा क्रमांक 1, सकीना शब्बीर नालबंद शाळा क्रमांक 13, मंगल अविनाश साळुंखे नवीन मराठी शाळा, विश्वासराव चंद्रसेन साळवे मराठी मिशन युनियन स्कूल, अनुपमा प्रशांत साळवी आदर्श कर्मचारी मराठी मिशन युनियन स्कूल, आणि आदर्श शाळा प्रवर्गामध्ये नगरपालिका शाळा क्रमांक आठ असे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे

या कार्यक्रमास नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सर्व शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाधिकारी मारुती भांगे यांनी केले आहे

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!