पंढरपूरात तीनशे कामगारांना सुरक्षा किट वाटप


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२३ । पंढरपूर । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले. कल्याणकारी महामंडळ व सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात कामगारांच्या मुलभूत समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामगारांच्या अर्थिक, मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, आरोग्य विषयक समस्यांवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. अशा योजनांची माहिती या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी सत्यशोधक कामगार संघटने मार्गदर्शक रवी सर्वगोड, जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे, शाहु सर्वगोड, राजु सर्वगोड, सुरज साखरे, अमित भोपळे, समाधान भोसले, किशोर कदम, भुषण सर्वगोड, स्वप्निल कांबळे, सिध्दनाथ सांवत, सागर धनवजीर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!