सुरवडी परिसरात मदत किटसह औषधी गोळ्यांचे वाटप


स्थैर्य, फलटण, दि. २१ : कोरोना आपत्तीच्या पाश्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून यामुळे गोरगरिब वंचित अन्नपाणी व औषधांपासून वंचित राहू नये म्हणून पूणे येथील आयकर आयुक्त आयु. तुषार शांताराम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवडी येथील सागर सुदाम भोसले, स्वप्निल संजय मोहिते, विनोद धर्मा जाधव, युवराज हणमंत जाधव, महेश सिताराम जाधव, केशव माणिक जाधव, सुर्यकांत जिवन मोहिते, संदीप जयवंत कांबळे आदी युवकांनी एकत्र येत गरजूंना प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या औषधी गोळ्या व मदतकिटचे वाटप केले. तसेच आपत्तीकाळात घरातच राहून कुटंबाची काळजी घेण्याचे आवाहन करीत प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी येथील अनेक गोरगरिब गरजूंनी याचा लाभ घेतला व तुषार मोहिते यांचेसह सर्व युवकांना धन्यवाद दिले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!