दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
भारतीय कृत्रीम अपंग निर्माण निगम कानपूर या केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत आवश्यक असणारे सहाय्यक साधने पुरविण्यासाठीचे मिळालेल्या साहित्याचे वाटप दि. २३ ऑगस्ट २०२४ व दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत शासकीय धान्य गोडावून, फलटण (तहसील कार्यालयाशेजारी) या ठिकाणी आयोजित केले आहे.
या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, भारतीय कृत्रिम अपंग निर्माण निगम कानपुर संस्थेच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील १३०२ व फलटण नगर परीषद हद्दीतील १४० असे एकूण १४४२ दिव्यांग लाभार्थींना सहायभूत साहित्याचे (तीन चाकी सायकल, वॉकर, चष्मे कुबडी स्वयंचलीत सायकल, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र इ.) वाटप करण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थींच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषद यांना देण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग लाभार्थींनी सदर यादीमध्ये आपल्या नावाची खात्री करून कार्यक्रमासाठी नियोजित दिनांकाचे वेळी आधार कार्ड व युडी आयडी कार्डच्या दोन झेरॉक्स प्रती घेऊन उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले आहे.