
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, नागठाणे, दि.१७: आरे (तर्फ परळी, ता. सातारा) येथील प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने (कै.) सुरेखा (लक्ष्मी) मोहन गुरव (माई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सचिन गुरव, उपाध्यक्ष इक्बाल काझी, सचिव तातोबा भिसे, सरपंच दीपक महाडिक, उपसरपंच सुरज किर्तीकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संदीप महाडिक, जितेंद्र गुरव, लक्ष्मण भिसे, महेश देशमुख, सुनील शिंदे, लालासाहेब किर्ते, नंदकुमार साठे, जगन्नाथ गायकवाड तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. या वेळी गावातील 50 गरजू कुटुंबीयांना जीवनाश्यक वस्तू असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. येत्या काळात वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. सचिन गुरव यांनी दिली.



